शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांची प्रमुख उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज १६ जून २०२५ या एकाच दिवशी सर्व शाळा सुरू झाल्या असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जि.प.प्राथमिक केंद्र शाळेत सन २०२५ – २६ या शैशानिक वर्षांकरिता नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोस्तोव कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शाळेतील इयत्ता १ पहिली च्या नवागत विद्यार्थ्यांचे व शाळेत इतर वर्गात नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शिंपी यांच्या शुभहस्ते शालेय पाठ्य पुस्तके, वह्या, बुट व गोडपदार्थ तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, ग्रा.पं. सदस्य अस्ताली पवार, समग्र शिक्षण विभागाचे समन्वयक सुशांत रणदिवे, खारेपाटण केंद्रप्रमुख संजय पवार, साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, खारेपाटण केंद्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष प्रियांका गुरव, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, माता पालक संघ उपाध्यक्ष संध्या पोरे खारेपाटण जि.प.केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ स्वागत करण्यात आले. तर शिक्षणाधिकारी शिंपी मॅडम यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान शाळेत नव्याने दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या महिला शिक्षकांच्या वतीने आरती ओवाळून व औंक्षण करून गोड पदार्थ खायला देऊन स्वगात करण्यात आले तर सर्व पालकांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेछा दिल्या. तर शिक्षणाधिकारी शिंपी मॅडम यांनी शाळेच्या नवागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेतील उपक्रमाचे कौतुक केले. “या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व व्यवस्थापन समिती चांगल्या पद्धतीनं काम करत असून त्याला पालकांची व विद्यार्थ्यांची देखील चांगली साथ लाभत आहे. त्यामुळे सर्वांच्या एक विचारमुळे ही शाळा आज राज्यातील आदर्श शाळा म्हणून नावारूपास आली आहे. हे आपल्या गाबसाठी व जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. असे त्यांनी प्रवेशोस्तव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षक व समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार जि.प.केंद्र शाळेचे उच्च श्री.मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रवणकर सर यांनी मानले.

















