सुशिक्षित आणि तरुण समाज बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना भोजलिंग काका सुतार समाज योजनेचा लाभ मिळवून द्या- विद्यानंद मानकर

विश्वकर्मा सुतार समाज मेळावा मालवण कुंभार माठ येथे उत्साहात; सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव…!

आचरा (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समिती मालवणच्या वतीने रविवार १५ जून २०२५ रोजी तालुक्यातील सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि समाज बांधव मेळावा मालवण कुंभार माठ जानकी मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्यानंद मानकर मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, विश्वकर्मा क्रांती दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ नांदेड, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव सुतार सातारा आणि पुणे शहरातील सुतार समाज संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!