भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे : मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी ) : वैभववाडी भाजपाच्या वतीने बुधवार दि. १८ जून रोजी विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन येथील अर्जुन रावराणे विद्यालय सभागृहात करण्यात आले आहे.आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. या कालावधीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व लोकाभिमुख योजनांची माहिती गावोगावी व मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आला आहे.
तरी या सभेला भाजपा जिल्हा व तालुका कार्यकारणी सदस्य, भाजपा सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, वैभववाडी शहर कार्यकारिणी सदस्य, शक्ति केंद्रप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व सोसायट्यांचे संचालक, बूथ प्रमुख, माजी बूथ प्रमुख व भाजपा कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.












