माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत नवागतांचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे नवगत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन आर्.एच्. सावंत,सदस्य बावतीस घोन्सालवीस,नितीन सावंत, आदी मान्यवर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्य पालक वर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीचे मातेचे पूजन करून नवीन प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवी ते नववीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर सर यांनी केले, तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक बयाजी बुराण यांनी अथक मेहनत घेतली.

error: Content is protected !!