महाराष्ट्र राज्यातील अभिनव उपक्रम राबविणारी पहिलीच शाळा केंद्रशाळा कौलव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी,केंद्रशाळा कौलव ता. राधानगरी या शाळेतील २४३ विद्यार्थ्यांचा दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती विमा आणि अपघातामुळे करावा लागणारा वैद्यकीय खर्च या पॉलिसीचे वितरण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

विविध कारणांमुळे शालेय विद्यार्थ्यांना अपघात होत असतात. यामध्ये बऱ्याचदा अपघाती मृत्यू होणे किंवा अपंगत्व येणे अशाप्रकारच्या गंभीर घटना घडतात. अशावेळी पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर मुलांवर चांगल्या दर्जाचे उपचार करता येत नाहीत. हे लक्षात घेऊन कौलव गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव हुजरे यांनी केंद्रशाळा कौलव या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व २४३ मुलांची जबाबदारी घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यामागे आवश्यक रक्कम विमा कंपनीकडे भरून प्रत्येक विद्यार्थ्याचा १,००,००० रुपयांचा विमा उतरविला आहे. अशा प्रकारे मुलांना २ कोटी ४३ लाख रुपयांचे विमा संरक्षण देणारी महाराष्ट्र राज्यातील केंद्रशाळा कौलव ही पहिलीच शाळा ठरली आहे.

या विमा पॉलिसीचे वितरण नामदार प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. यावेळी प्रकाशराव हुजरे, युवा नेते मनोज पाटील , ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, विशाल कुंभार , प्रकाश कांबळे , आण्णापा चौगले, उत्तम चरापले , धुळापा यादव, नेताजी हुजरे, सुरज हुजरे , संग्राम चौगले , मुख्याध्यापक पंडीत चव्हाण , शाहू चौगले सर आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!