सर्व पर्यावरण प्रेमी संघटना व सह्याद्री फौंडेशन आयोजित श्रद्धांजली सभा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मधुकर बाचूळकर- चितमपल्ली सरांनी आमच्यासारख्या अभ्यासकांना मार्गदर्शन केले. बुद्धाझ कोकोनट या वनस्पतीची माहिती त्यांच्याकडून मिळाली. ही वनस्पती टाउन हॉल मध्ये ही आहे.

उदय गायकवाड- चितमपल्ली सर आमच्या गुरुस्थानी आहेत. अनेक फ़ॉरेस्ट ऑफिसर झाले, पण सरां सारखा अवलिया एकमेव होता. आपल्या कारकिर्दीत सरांनी फक्त निरीक्षण केले नाही तर प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली. या नोंदी त्यांनी साहित्य रुपाने आपल्यापर्यंत पोचवली.

सुहास वायगणकर- “जो माणूस वनात रमतो, चाफा त्याच्या मनात फुलतो” असे लिहीत आपल्या अनुभवांना शब्दरुपी आकार देत निसर्ग प्रेमींना समृद्ध करणारे व्यक्तिमत्व हरपले.

अमोल बुडे:- मारुती चित्तमपल्ली  सरांच्या प्रेरणेतून कोल्हापूरतील वनराई टिकवणे आणि वाढवण्याचे काम अखंड सुरू ठेवू

बटू शिरोळे, अविनाश शिरगांवकर व अविनाश लाड यांनी मनोगते व्यक्त केली.

समारोप सह्याद्री फौंडेशनच्या संदीप देसाई यांनी केला व मारुती चितमपल्ली यांची प्रेरणा घेऊन शहरात निसर्ग संवर्धनाचे काम करण्याचा निःशचय केला.

उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!