कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची मालवण पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली झाल्याबद्दल त्यांच्या पुढील कारकिर्दीस कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी जुलै 2024 पासून कणकवली पोलीस ठाणे प्रभारीपदी निःपक्षपाती पणे कर्तव्य बजावले. कणकवली तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच जनतेशी सुसंवाद ठेवला. त्यांची मालवण येथे बदली झाल्यानिमित्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी जगताप याना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा ग्रामीण युवा मंडल अध्यक्ष सहदेव उर्फ अण्णा खाडये, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, हरकुळ खुर्द उपसरपंच सर्वेश दळवी,कळसुली सरपंच सचिन पारधीये, सुभाष मालंडकर, निखिल आचरेकर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक मारुती जगताप याना भाजपा पदाधिकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा












