पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने वृक्ष लागवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना विभाग खारेपाटण यांच्यावतीने खारेपाटण रेल्वे स्टेशन रोड कोडवाडी येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण विभाग प्रमुख तसेच खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरूप्रसाद शिंदे, खारेपाटण शहर प्रमुख सुहास राऊत, शिवसेना कार्यकर्ते सचिन शिंदे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जांभळ, आंबा कलम, बेल, सोनचाफा आदी अनेक लोकोपयोगी वृक्ष झाडे यावेळी लावण्यात आली. तसेच या झाडांची संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व शिवसैनिकांनी घेतली असून पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा संदेश देण्याचे काम यानिमित्त करण्यात आले असल्याचे यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी सांगितले.

error: Content is protected !!