जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने कुणकवण येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : श्रीधर (अण्णा) तावडे ग्रामविकास संस्था आणि जीवन प्रबोधिनी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील कुणकवण या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेतील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच पहिले ते सातवीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सत्यवान नर म्हणाले, विकासाचा मार्ग हा शिक्षणातून जातो. शिक्षणामुळे व्यक्ती अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू बनते म्हणूनच त्याच्या वैयक्तिक विकासाबरोबरच गाव, शहर, राज्य आणि देशाचा विकास होतो. तसेच विध्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींबद्दल कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन व काही त्रुटी असल्यास त्यांना सहाय्य करण्यास जीवन प्रबोधिनी ट्रस्ट नेहमची प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही सत्यवान नर यांनी दिले.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक मेघनाथ शेट्टी, जि.प. प्राथमिक शाळा नं.१ कुणकवणचे मुख्याध्यापक सचिन जायभाय, शिक्षिका रियंका दिलीप दोडवे, शिक्षक स्वप्निल विष्णुपंत पाटील, कुणकवण गावचे उपसरपंच जीतू कदम, माजी सरपंच श्रीराम ठाकूर देसाई, संतोष रावराणे, योगेश रावराणे, राजन पाटणकर, विठोबा राणे, राजाराम पाटणकर, ग्रा.पं. सदस्या सौ.पाटणकर आदी मान्यवरही उपस्थित होते.

error: Content is protected !!