केक भरवून वाढदिवस केला साजरा
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांच्या उपस्थितित ओरोस येथे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. स्वतः मंत्री नितेश राणे यांनी मिलिंद मेस्त्री यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदीप साटम, संदीप मेस्त्री, सचिन पारधिये, मनोज रावराणे, संतोष पारकर आदी उपस्थित होते.












