उपसभापती सोनू सावंत यांचे पालकमंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली पं स उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल राजेश उर्फ सोनू सावंत यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिनंदन केले. पं स सभापती उपसभापती निवडीनंतर प्रथमच मंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी ओरोस येथे मंत्री नितेश राणे यांची उपसभापती सोनू सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, पं. स. सदस्य बबलू सावंत, गुरुप्रसाद शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!