फोंडाघाट (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा, फोंडा नं. १ येथील इयत्ता २ री, ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षा प्रमाणेच यावर्षीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
इयत्ता ४ थी मधून समर्थ समाधान वाघमोडे याने १६४ गुण मिळवत गोल्ड मेडल पटकावले. तर पृथ्वीराज मारुती लाड (१४८ गुण) याला सिल्व्हर मेडल मिळाले. याशिवाय वीरा आनंद तावडे, रिया जानू खरात, अस्मि नरेश मांजरेकर, निधी श्रीधर रावराणे, प्रांजल नारायण सावंत आणि जुई हेमंत म्हापसेकर यांनीही चांगले गुण मिळवले. इयत्ता ३ री मधून तन्मय लकुळ गोसावी (१७८) आणि रुद्र दत्तात्रय रेवडेकर (१६०) यांनी गोल्ड मेडल मिळवले. विराज विजय आग्रे (१३८) याने सिल्व्हर मेडल मिळवले. तसेच अर्णव विजय राणे, किंजल कांतीलाल गांगुर्डे, सोहम सोमा म्हाडगुत, पार्थ सचिन सापळे, प्रचिती सुनिल शिंदे, आयुष राजेंद्र मर्ये, देविका महेश राठोड आणि सोनाबाई परशुराम भिसे यांनीही छान गुण मिळवले. इयत्ता २ रीमधून तनिष प्रशांत सापळे (१५०) व चिराग स्वप्नील गवळी (१४८) यालाही सिल्व्हर मेडल मिळाले. वेद्यम सुनिल शिंदे (११२) याने ब्रॉन्झ मेडल पटकावले. तसेच मृण्मयी कमलेश बिडये, धनश्री सागावकर, मयंक जानू खरात, गोपाळ गजानन सावंत, स्वरा गायकवाड, हर्षाली गणेश तेली आणि गायत्री सूरज नानचे यांनी परीक्षेत सहभाग नोंदवत चांगले गुण मिळवले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पालक आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.














