सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वैभववाडी पं स सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सभापती सिद्धेश रावराणे यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेत आशीर्वाद घेतले. पं स सभापती उपसभापती निवडीनंतर प्रथमच नामदार नितेश राणे यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी हेलिपॅडवर जाऊन सभापती सिद्धेश रावराणे यांनी मंत्री नितेश राणेंची भेट घेतली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सिद्धेश रावराणे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री नितेश राणेंची सभापती सिद्धेश रावराणेंनी घेतली सदिच्छा भेट












