शेतकऱ्यांना पावसाळ्यात कामांच्या सत्रामध्ये पशुधन तंदुरुस्त राहण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे- डॉ.प्रल्हाद गाडेकर

वाघेरी गावात कृषीकन्या आयोजित लसीकरणाला उदंड प्रतिसाद !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी कन्यांतर्फे “ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव” कार्यक्रमांतर्गत वाघेरी येथे जनावरांना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.आपल्या भारतीय शेती क्षेत्रामध्ये पशुंचे असणारे महत्त्व लक्षात घेऊन, त्यापासून पावसाळा या ऋतूमध्ये विविध आजारांपासून संरक्षण करण्यासाठी, तसेच त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी पशूंचे लसीकरण करून घेणे आवश्यक असते तसेच त्या लसीकरणाच्या वेळी डॉ.प्रल्हाद गाडेकर यांनी जनावरांना आरोग्याची कशी काळजी घ्यावी, विविध आजारांपासून प्रादुर्भाव कसा टाळावा याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर लसीकरण शिबिराला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरामध्ये प्रिया नागरगोजे, समृद्धी कुराडे, नम्रता महामुनी, साईश्वरी निकम, प्रांजल भोसले, प्रगती जाधव, कल्याणी पाटील, प्रज्ञा देशमुख, निकिता कावणेकर, ज्योतिका कंदले, लावण्या झोरे या कृषीकन्यांनी परिश्रम घेतले. या मोहिमेमध्ये वाघेरी गावांमधील सरपंच व ग्रामपंचायतचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विषय तज्ञ यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता आली.

error: Content is protected !!