बांदा दोडामार्ग रस्त्यावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक

अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे झाला. बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने येत असता पानवळ येथे समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले. अपघातात फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे.

error: Content is protected !!