ओरोस (प्रतिनिधी) : पंचशील सेवा ट्रस्ट आदर्श नगर ओरोस व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिजामाता चौक ते हुमरमळा हायवे लगत दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून हा वृक्षारोपणाचा उपक्रम संयुक्तपणे साजरा करीत आहे. ओरोस ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग मालवणकर यांचे हस्ते वृक्षलागवड करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रा. वैभव कदम यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यांनी सहकुटुंब वृक्ष लागवडीस सहभाग घेतला.
यावेळी पंचशिल सेवा ट्रस्टचे आदर्श नगरचे अध्यक्ष संजय खोटलेकर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर, सदस्य राजन वालावलकर, नामदेव मठकर, चंद्रकांत कदम गुरुजी, शंकर भोगले, भास्कर चव्हाण, शरद सोनवडेकर, मयेकर, अरुण सावले आदी जागृत नागरीक उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा कडूलिंब, सांग, बदाम, चिंच, वड, ऐन अशी कायमस्वरूपी सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी शोभा मोतीराम कसालकर अधिपरिचारिका सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हिनेही आपल्या वतीने या कार्यक्रमाला वृक्षांचा पुरवठा केला होता. घोगळे हार्डवेअरचे मालक रामचंद्र घोगळे सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थितांना चहा बिस्किटाची सोय केली.












