महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून करणार अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

आषाढी एकादशी आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत निर्णय

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येईल. त्यासाठी प्रथम प्राचार्य, प्राध्यापक आदींची बैठक आयोजित करून त्याबाबतचे नियोजन करू, असा निर्णय उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी घेतला. पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ही माहिती दिली.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खंदारकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, नकुल पार्सेकर, अभिमन्यू लोंढे, हिदायतुल्ला खान, ऑगोस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते. आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. सावंतवाडी शांतता प्रिय शहर आहे. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस नेमण्यात यावेत, असे सुचविण्यात आले.

error: Content is protected !!