अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे कृषी दिन साजरा

महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने एन.सी.सी विभागाच्या वतीने वृक्षारोपण

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन अनेक उपक्रमांचा माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे एन.सी.सी. विभागाच्या वतीने प्रशालेच्या आवारात तसेच प्रशालेच्या परसबागेत शेवगा व फळभाज्यांची रोपे लागवड करण्यात आली. याप्रसंगी शेतकरी बांधवांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, शिंदे एस.बी., एन.सी.सी विभाग प्रमुख एस.टी.तुळसणकर, पवार पी.बी., कलाशिक्षक एम.एस. चोरगे तसेच एन.सी.सी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!