वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ले भटवाडी येथे मुख्य रस्त्यावर एसटी बस आणि कॅन्टरची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. एसटी बस वेंगुर्ले येथून कुडाळकडे जात होती तर कॅन्टर वेंगुर्लेकडे येत होता. भटवाडी येथे दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या आणि अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे समोरील बाजूचे नुकसान झाले असून दोघेजण जखमी झाले आहेत. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळी पोलीस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.
वेंगुर्ल्यातील घटना; एसटी बस आणि कॅन्टरच्या अपघातात दोघे जखमी











