कार ओहोळात कोसळली; बांदा पुलावर झाला अपघात

एनडीआरएफ टीम मार्फत शोधकार्य सुरु

दोडामार्ग (प्रतिनिधी) : बांदा बसस्थानक नजीक असलेल्या पुलावरून भरधाव वेगात आलेली कार ओहोळातील पाण्यात कोसळून अपघातग्रस्त झाली. हा अपघात रात्री एक वाजताच्या सुमारास झाला. ओहोळ तुडुंब भरला असून कारमध्ये कोणी असण्याची शक्यतेने एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. आज सकाळी ही घटना येथील नजीकच असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पांगम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती बांदा पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना दिली. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार (एमएच ०७ एजी ०००४) रात्री ओहोळात कोसळली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने व मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघात झाल्याचे लक्षात आले नाही.

error: Content is protected !!