सरपंच वासुदेव रावराणे यांनी ग्रामस्थांसह झाड बाजूला करत वाहतूक केली सुरळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : फोंडाघाट वैभववाडी राज्यमार्गावर आचिर्णे वड येथे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अकेशियाचे झाड रस्त्यावर कोसळून वाहतुकीस अडथळा झाला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणारी वस्तीची एसटी खोळंबून राहिली होती. आचिर्णे सरपंच वासुदेव रावराणे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जात ग्रामस्थांसह वुड कटरच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले झाड हटविण्यासाठी सुरुवात केली. सकाळी 8 वाजता रस्त्यावर पडलेलं झाड हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला.













