करूळ घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने करूळ घाटात शुक्रवारी दुपारी दरड कोसळली. यामुळे काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने जेसिबिच्या साहाय्याने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.

करूळ घाटात करूळ चेक पोस्ट पासून सुमारे ५ किमी अंतरावर रस्त्यावर दरड पडली होती. याची माहिती मिळताच रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी तैनात असलेल्या वेल्हाळ कंपनीच्या जेसिबिच्या साहाय्याने तासाभरात दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. दरड पडल्याची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच वाहतूक सुरळीत करणेसाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.

error: Content is protected !!