चौके (प्रतिनिधी) : अधिवक्ता परिषद मालवण तालुका व तालुका विधी सेवा समिती मालवण यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.०३ जुलै २०२५ रोजी मालवण न्यायालयातील वकील कक्षामध्ये सर्व वकील व न्यायालयीन कर्मचारी यांचेकरिता मोफत आरोग्य विषयक मार्गदर्शन आणि बी.एम.आय. तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये संपूर्ण मानवी आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच आजार मुक्त, औषध मुक्त, डॉक्टर मुक्त निरोगी जीवन कसे जगावे, आजारपणाची कारणे, साधी सोपी घरी करता येईल अशी उपाय योजना या विषयी विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी स्वस्थ भारत समृद्ध भारत अभियान, भारतीय वेलनेस इंडस्ट्री अंतर्गत प्रमुख मार्गदर्शक मोहसीन शेख- मुंबई, सहाय्यक अनंत परब- सावंतवाडी- मुंबई आणि सायली परब- कुसरवे- मालवण उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ मालवण तालुक्यातील बहुसंख्य वकील आणि न्यायालयीन कर्मचारी यांनी घेतला. या कार्यक्रमाचे मान्यवर, वक्ता यांचा परिचय व सूत्रसंचालन अधिवक्ता पलाश चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिवक्ता परिषदेचे मालवण तालुका अध्यक्ष अधिवक्ता प्रदीप महादेव मिठबावकर यांनी केले. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मोहसीन शेख- मुंबई, सहाय्यक अनंत परब- सावंतवाडी- मुंबई यांनी विस्तृत सविस्तर स्वरुपात मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थितांचे प्रश्न आणि शंका याचं निरसन करण्यात आले. अधिवक्ता परिषदेचे मालवण तालुका अध्यक्ष अधिवक्ता प्रदीप महादेव मिठबावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिवक्ता गिरीश गिरकर, अधिवक्ता समीर गवाणकर, अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर, अधिवक्ता हर्षद तरवडकर, अधिवक्ता पलाश चाव्हाण, अधिवक्ता अक्षय पवार, अधिवक्ता एस.व्ही. प्रभूखानोलकर, अधिवक्ता माधवी बांदेकर, अधिवक्ता शिल्पा टिळक, अधिवक्ता रश्मी मोंडकर, अधिवक्ता लता मोंडकर त्याचप्रमाणे तालुका विधी सेवा समिती मालवणच्या वरिष्ठ लिपिका यु.एन.मालणकर व कनिष्ठ लिपिक एम. पी.जाधव यांचे सहकार्य लाभले.











