खारेपाटण येथे आशा राजाराम कावळे पॅरानर्सिंग कोर्स द्वारे विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटणच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग क्षेत्रामधील करिअरची एक उत्तम संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चालू शैक्षणिक वर्षापासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त आशा राजाराम कावळे पॅरानर्सिंग कॉलेज खारेपाटण येथे प्रथमच सुरू करण्यात येत असून याचा फायदा दशक्रोशीतील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. या प्रशिक्षण कोर्स द्वारे रुग्णसहाय्यक शिक्षण अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला असून यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमातून सरकारी किंवा खासगी रुग्णालयात, वृद्धाश्रमात, शाळांमध्ये किंवा इतर आरोग्य सेवा संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी उपलब्ध होत आहे. रुग्णसहाय्यक शिक्षणक्रमामध्ये चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना याद्वारे उपलब्ध करून दिली जाते. तर या अभ्यासक्रमासाठी इयत्ता दहावी पास अथवा नापास विद्यार्थी,सिनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी तसेच रुग्णालयात काम करणारे अकुशल कर्मचारी,रुग्णालयात आधीपासून काम करणारे इ.१०वी पास अथवा नापास कर्मचारी यांना प्रवेश घेता येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चालू शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाची सुरुवात खारेपाटण कॉलेज येथे करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया खारेपाटण कॉलेजमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन खारेपाटण प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!