खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संतोष तथा पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र सरकराच्या प्रधानमंत्री वयवंदना योजनेविषयी ज्येष्ठ नागरिकांना नुकतेच ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बबलू पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गाडे, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निलोफर जमादार, शेर्पे उपकेंद्रचे सी. एच. ओ. – श्री. माने, आशा स्वयंसेविका वैष्णवी पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जमादार यांनी प्रधानमंत्री वयवंदना योजनेविषयी ग्रामस्थांना विस्तृत माहिती दिली. तर सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांनी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन याप्रसंगी केले. यावेळी कुरंगवणे – बेर्ले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या ७० वर्षे वयायेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रधानमंत्री वयवंदना योजनेची कार्ड ऑनलाईन मोफत काढून देण्यात आली.या उपक्रमाबद्दल सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

