शिराळे येथील बेपत्ता वृद्धाचा कोकिसरे शुकनदी पात्रात मृतदेह

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिराळे गावठाण येथील बेपत्ता झालेले वृद्ध नारायण केशव पाटील वय ७० यांचा मृतदेह कोकिसरे बोर्चीवाडी शुकनदी पत्रात मंगळवारी सकाळी ८ वा. सुमारास आढळून आला. मयत नारायण पाटील हे १ जुलै रोजी सकाळी वैभववाडीला जातो असे पत्नीला सांगून घरातून निघाले होते. सायंकाळी ते परत घरी आले नाही. नातेवाईकांनी त्यांची सगळीकडे शोधाशोध करून ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने २ जुलै रोजी वैभववाडी पोलिस ठाणेत याबाबत खबर दिली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी नापणे येथील रवी आकाराम शिवगण यांना नदी पात्रता एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह दिसला. त्यांनी याबाबत गावच्या पोलिस पाटील स्वाती टक्के यांना दिली. पोलिस पाटील यांनी वैभववाडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी पोलिस अभिजित तावडे, धनाजी धडे, किरण मेते यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. वैभववाडी पोलीस ठाणेत बेपत्ता नोंद असलेल्या नारायण पाटील यांच्या कुटुंबियांना मृतदेहा बाबत माहिती देण्यात आली. मयताचा मुलगा समीर पाटील यांनी मृतदेह आपल्याच वडिलांचा असल्याचे ओळखले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला. याचा तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!