कणकवली (प्रतिनिधी) : गुरू शिष्य परंपरेचे महत्व अधोरेखित करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुंबई येथे नामदार नितेश राणे यांच्या दालनात भेट घेत कणकवली विधानसभा संघटक मनोज रावराणे, पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, कणकवली मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, बंड्या मांजरेकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त पुष्पहार घालून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रात आपले गुरू असतात. सिंधुदुर्ग च्या राजकीय पटलावर भाजपा युवा कार्यकर्त्यांना गुरुस्थानी असलेले पालकमंत्री नितेश नारायणराव राणे यांची भेट घेत भाजपा कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. विशेषतः कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची मोट बांधणे, पक्षसंघटन वाढविणे, कार्यर्त्यांच्या अडीनडीला धावून जात त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील घटक बनण्यात मंत्री नितेश राणे यशस्वी ठरले आहेत. सलग 3 वेळा विजयी हॅट्ट्रिक साजरी करताना नितेश राणे यांनी कायमच आपल्या कार्यकर्त्यांना जपले, आणि घडविलेसुद्धा. केवळ राजकारणातच नव्हे तर व्यवसायात सुद्धा स्थिर होण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य मंत्री नितेश राणेंनी आजवर केले आहे. त्यामुळेच त्यांचे कार्यकर्ते त्यांना गुरुसमान मानतात. गुरुपौर्णिमेनिमित्त आज मुंबई येथे नामदार नितेश राणे यांच्या दालनात भेट घेत कणकवली विधानसभा संघटक मनोज रावराणे, पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, कणकवली मंडल तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, बंड्या मांजरेकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त पुष्पहार घालून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री नितेश राणेंना गुरुपौर्णिमेनिमित्त दिल्या शुभेच्छा












