कणकवली (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत भजनी कलाकार, वारकरी, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभरात गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी केली जात आहे. कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुपौर्णिमेनिमित्त भजनी कलाकार, वारकरी संप्रदायाचे सदस्य व शिक्षकांचा शाल ,श्रीफळ, व श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोर्डवे सरपंच वेदांगी पाताडे, उपसरपंच महावीर साळवी,माजी सरपंच गजानन शिंदे, माजी सरपंच राजेंद्र मोडक, बूथ अध्यक्ष आनंद शिंदे ग्रामपंचायत सदस्या अपराध उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त कणकवली तालुका भाजपाच्या वतीने भजनी कलाकार, वारकरी, शिक्षकांचा सत्कार











