प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत मळगाव मधील विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिरवल येथील प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने मळगाव येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी मधील एकूण 450 विद्यार्थ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्याचा प्राणजीवन सहयोग संस्थेचा मानस आहे. त्याची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी कणकवली तालुक्यातील शाळांपासून केली होती. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना हे रेनकोट वाटप करायचे आहे. मळगाव येथील मळगाव रस्ता अंगणवाडी शाळा, शारदा विद्यालय रस्ता शाळा, मळगाव सावळवाडा शारदा मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मळगाव, आंबेडकर नगर मळगाव बालवाडी अंगणवाडी, देऊळवाडी मळगाव अंगणवाडी, केंद्रशाळा मळगाव ब्राह्मणपाट, जिल्हा परिषद शाळा ब्राह्मणपाट, कुंभारवाडी मळगाव अंगणवाडी, गावकरवाडी अंगणवाडी या शाळेमध्ये रेनकोटचे वाटप करण्यात आले.

प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवले जातात. कोरोना कालावधीत प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी स्तुत्य उपक्रम राबवले होते. मळगाव येथे रेनकोट वाटप कार्यक्रमावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप चौककर, संस्था प्रतिनिधी गीतेश शेणई, धनंजय गडेकर, प्राध्यापक गणपत शिरोडकर, शेखर पाडगावकर, चंद्रकांत जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, गौरी रेडकर, सदस्य विजय ठाकूर, स्वरा वारंग, दिव्या पवार, अंगणवाडी शिक्षिका विनया पवार, सहाय्यक वैशाली नाईक, कुंभार्ली पोलीस पाटील गीता गावडे, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. या रेनकोट वाटपाबद्दल शाळेच्यावतीने मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!