वैभववाडी (प्रतिनिधी) : आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्य आहे. पहिले गुरु हे आपले आईवडील आहेत. त्यानंतर जे आपल्याला शिकवतात ते गुरुजन असतात, त्यांचा मान, सन्मान केला पाहिजे. असे प्रतिपादन बाप्पी मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मण देव वाडी शाळेत गुरुपौर्णिमिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक संजय पाताडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल कोकाटे, उपाध्यक्ष निकिता कांबळे, सूर्यकांत कांबळे, रेणुका वारिक, देवलकर, कोकरे, खोत, नानारकर, बाबू इस्वलकर, शेणवी, दीपक इंदप, चंद्रकांत मुद्रस, पंढरीनाथ सावंत संदीप कोळेकर सुजाता कुडतरकर आदी उपस्थित होते.











