मेरा युवा भारत आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन यांचे संयुक्त आयोजन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ऑगस्ट, २०२५ रोजी आयोजित करण्यात आली असून, ती केवळ सावंतवाडी तालुक्यातील १८ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली असणार आहे. स्पर्धकांनी खालील चारपैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार मांडायचे आहेत:
१) आजच्या युवकांसमोरील आव्हाने
२) आजच्या भारतात स्त्री खरंच सुरक्षित आहेत का?
३) येवा कोकण आपलोच असा – पण तो कोकण टिकवण्यासाठी आमची जबाबदारी काय?
४) कधी मिळेल का कोकणातल्या तरुणाला त्याच्याच कोकणातल्या मातीत रोजगार?
स्पर्धकांना ५+२ मिनिटे इतका वेळ देण्यात येणार असून, नावनोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२५ अशी असून, सहभागी स्पर्धकांनी वयाचा पुरावा (उदा. आधार कार्ड, कॉलेज आयडी कार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना प्रथम क्रमांक ₹३०००, द्वितीय क्रमांक ₹२००० व तृतीय क्रमांक ₹१०००, यासह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी संपर्क:
फिजा – ७२१८७६६९२६
कामाक्षी – ९५७९६९५८०५











