आंबेरी येथे विविध विकासकांचा शुभारंभ

नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

चौके (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील आंबेरी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबेरी मळा शाळा ते खारबंधारा रस्ता कामाचे भूमिपूजन आणि जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना या कामाचे उद्घाटन आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर आणि उपसरपंच रवींद्र परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मनमोहन डिचोलकर उपसरपंच रवींद्र परब ग्रामसेवक सौ. स्वाती कदम सदस्य गणेश डिचोलकर, पूर्वा मुसळे,मीनल सामंत, रुंदा केळुसकर, माजी सरपंच सचिन आंबेरकर ग्रामस्थ समीर मांजरेकर, रमेश पाटकर, धनंजय आंबेरकर, अमित डिचोलकर, भूषण मयेकर, नितीन हूर्णे, भाई आस्वलकर, शेखर आंबेरकर, प्रभाकर मायनाक, सुरेश मसुरकर, स्वप्नील हुर्णे, शामसुंदर आंबेरकर, बाबा मायनाक, अमृत आंबेरकर, दादा हडकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!