कणकवली (प्रतिनिधी): ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल नर्सिंग कॉलेज मध्ये ए. एन. एम. परीक्षेचा निकाल १००% लागला यामध्ये प्रथम क्र- प्राची यशवंत जाधव (87.37%) द्वितीय क्र- महेजबीन शौकतअली बटवाले (86.87%) तृतीय क्र- सानिका संजय धुरी (85%) तर ८ विद्यार्थी विशेष प्राविण्य व ९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना प्राचार्या सौ. सोआ नाईक, ट्यूटर कु. पूजा आचरेकर, कु. पल्लवी सुतार यांचे मार्गदर्शन लाभले . सर्व यशस्वी नर्सिंग विद्यार्थिनी चे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल ठाकूर, चेअरमन श्री बुलंद पटेल आणि सेक्रेटरी प्रा. हरीभाऊ भिसे यांनी केले.