खारेपाटण येथील लिटिल स्टार फन स्कूल चा ३ रा वर्धापन दिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण शिवाजी पेठ येथील लिटिल स्टार फन स्कूल या चिमुकल्या २ ते ६ वर्ष वयोगटातील लहान मुलांच्या शाळेचा ३ रा वर्धापन दिन सोहळा नुकताच खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्ताहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच वीरेंद्र चिके, खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर, मंगेश गुरव, राजेंद्र चिके, शाळेच्या संचालिका ऋतुजा राजेंद्र चिके आदी मान्यवर व पालक वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून व केक कापून करण्यात आली. यावेळी सरपंच प्राची ईसवलकर यांचेकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तर लिटल फन स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या यापूर्वी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्राची ईसवलकर यांनी सर्व मुलांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या संचालिका ऋतुजा चिके यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!