कणकवली तालुक्यातील महसूल विभागाच्या 9 मंडळांमध्ये महाराजस्व अभियान संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यात दिनांक 1 ऑगस्ट, 2025 रोजी महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत “महसूल सप्ताह -2025” साजरा करणेबाबत शासनाने कळविले असून त्यामधील एक घटक म्हणजे दिनांक 04/08/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे. त्यानुसार आज दिनांक 04/08/2025 रोजी कणकवली तालुक्यातील सर्व ९ मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत महसूल प्रशासनाच्या सेवा व योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये सातबारा वाटप, वारस फेरफार, मंजूर फेरफाराची प्रत, संजय गांधी योजना चे मंजूर लाभार्थी यांना मंजुरीचे पत्र, जातीचे दाखले, उत्पन्न व वय अधिवास दाखले, कलम 155 अंतर्गत सातबारा दुरुस्तीचे आदेश, केंद्रीय पेन्शन योजनाचा लाभ घेण्यासाठी सत्यापन ॲप द्वारे हयात दाखला देणे, इत्यादी लाभ देण्यात आले. याप्रसंगी मंडळातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

महसूल सप्ताहच्या अनुषंगाने उद्या दिनांक 5 ऑगस्ट रोजी संजय गांधी योजनेतील ज्या लाभार्थी यांना आधार अपडेट नसल्याने DBT द्वारे पेन्शन मिळत नाही अशा लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालय कणकवली येथे आधार अपडेशन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तरी ज्या लाभार्थ्यांचे आधार अपडेट करायचे राहून गेले आहे त्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय कणकवली मार्फत करण्यात आले आहे.

  1. सातबारा/8अ व फेरफार — 181
  2. उत्पन्न दाखले — 33
  3. संजय गांधी /श्रावणबाळ योजना मंजूर आदेश 38
  4. वारस अर्ज कार्यवाही — 9
  5. कलम 155 अंतर्गत अर्ज — 6
  6. सत्यापन app हयात प्रमाणपत्र — 23
  7. जातीचे दाखले — 6
  8. वय अधिवास — 5
error: Content is protected !!