सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता प्राप्त स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती आदेश द्यावा तसेच जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत थकीत राहिलेले वेतन तात्काळ मिळावे या मागणीसाठी जामसंडे येथील प्रमोद सोनकुसरे यांनी आपल्या कुटुंबासमवेत आज पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे
देवगड जामसंडे येथील प्रमोद सोनकुसरे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी उपोषणाबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपण दिलेल्या दोन जानेवारी २०२५ च्या लेकी आदेशानुसारच ३ जानेवारी २०२५ रोजी केळकर हायस्कूल वाडा तालुका देवगड येथे वरिष्ठ लिपिक या पदावर नियमितपणे सेवेत हजर झालो आहे तथापि शासन निर्णयातील तरतुदीनुसार आज अखेर आपल्याकडून मला विहित नमुन्यातील स्वतंत्र नियुक्ती आदेश मिळालेला नाही त्यामुळे जानेवारी २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे वेतन मिळालेले नाही यामुळे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली याबाबत वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेट घेऊन लक्ष वेधले असतानाही अद्याप नियुक्ती आदेश मिळालेला नाही तसेच जानेवारीपासून आजपर्यंत वेतन मिळाली नाही त्यामुळे आर्थिक अडचण व कुटुंबीयांची उपासमार होत आहे आपल्याकडून तात्काळ अधिसंख्य पदावर नियुक्तीचे लेखी आदेश देण्यात यावेत तसेच जानेवारीपासूनचे थकीत असलेले वेतन मिळावे अशी विनंती केली आहे यासाठी प्रमोद सोनकुसरे यांनी आपल्या आई पत्नी व मुलगा यांच्यासह जिल्हा परिषदेसमोर आज पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील व याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची राहील असा इशारा दिला आहे.












