वैभववाडी पं. स. च्या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा १५ ऑगस्ट रोजी


वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. संपन्न होणार आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून या पंचायत समिती इमारतीसाठी सन २०१३ साली २ कोटी ५४ लाखाचा निधी मंजूर झाला होता. आता वैभववाडी पंचायत समिती सुसज्ज व प्रशस्त इमारत उभी राहिली आहे. या इमारतीचा भूमीपूजन सोहळा ही नारायण राणे यांच्या हस्ते पार पडला होता. या इमारतीमध्ये सुसज्ज सभापती, उपसभापती दालन, गटविकास अधिकारी दालन, सभागृह तसेच विविध शासकीय विभागांची सुसज्ज दालने बनविण्यात आली आहेत.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.

error: Content is protected !!