पालकमंत्री नितेश राणेंच्या सहकार्याने मिळाले अधिकृत रिक्षा स्टँड
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रिक्षा स्टॅन्ड मंजुर झाले. या रिक्षा स्टॅन्डचा शुभारंभ कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या रिक्षा स्टॅन्डच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे सोपे जाणार आहे. या ठिकाणी रिक्षा लावल्या जात असल्या तरी अधिकृत स्टॅन्डची मंजुरी नव्हती. त्याला कागदोपत्री मंजुरी देत हे स्टैंड लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण प्रसंगी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, रिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, माजी नगरसेवक आबिद नाईक, माजी नगरसेवक व गटनेते संजय कामतेकर, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक राजेश सुरवडे, अधिकारी जी. पी. प्रकाश, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश आमडोसकर, संजय मालंडकर, सुरेश सावंत, धोंडी सापळे व सर्व रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना रेल्वे स्टेशन रिक्षा स्टँडचे अध्यक्ष संतोष सावंत यांनी केली. सुत्रसंचालन व आभार बाळु वालावलकर यांनी मानले.











