स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून भंडारी समाजाचा सन्मान

जिल्हा नियोजन समिती सभागृहाला शिवरायांचे आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे नाव दिल्याबद्दल मानले आभार

देवगड (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख अपराजित योध्दा मायनाक भंडारी यांचे नाव सिंधुदुर्ग जिल्हयाच्या नियोजन सभागृहाला दिल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे देवगड तालुका भंडारी समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांचे देवगड तालुक्यातील भंडारी समाज बांधव बाळ खडपे, हेमंत करंगुटकर, विलास रुमडे, सुधीर मांजरेकर, वैभव करंगुटकर, हितेश शेडगे, प्रविण शेडगे, सुनिल बिर्जे, संजय बोंबडी तसेच सिंधुदूर्ग ज्ञातीबांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!