सतीश गुरव, तेजस राऊत यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपा प्रवेश
प्रवेशकर्त्या कार्यकर्त्याचा योग्य तो सन्मान पक्षात केला जाईल – नितेश राणे
खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा पक्षाला खारेपाटणमध्ये खिंडार पडले असून युवा उद्योजक व उबाठा पक्षाचे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ संपर्क प्रमुख सतीश गुरव व युवा सेनेचे कणकवली उपतालुका प्रमुख तेजस राऊत तसेच खारेपाटण उपविभाग प्रमुख निखिल गुरव यांसह सुमारे २५ प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी शनिवारी खारेपाटण येथे भारतीय जनता पार्टीत महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित जाहीर प्रवेश केला.
मंत्री नितेश राणे हे शनिवारी १६ ऑगस्ट, २०२५ रोजी कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवानिमित जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी खारेपाटण भाजप पक्षाच्या वतीने व युवा उद्योजक सतीश गुरव पुरस्कृत आयोजित केलेल्या १,११,१११ /- रुपये रकमेच्या दहीहंडी उत्सवाला त्यांनी भेट दिली. यावेळी खारेपाटणमधील शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व नवीन पक्ष प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे मंत्री नितेश राणे यांनी भाजप पक्षात स्वागत करून त्यांचा योग्य तो सन्मान पक्षात केला जाईल, असे यावेळी सांगितले.
दरम्यान भाजप पक्षात प्रवेश केलेले खारेपाटण येथील शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते पुढीलप्रमाणे – सतीश गुरव, तेजस राऊत, निखिल गुरव, सनी गुरव, शंकर राऊत, किशोर राऊत, महेश राऊत, हर्षद राऊत, चेतन राऊत, संजय जाधव, प्रशांत सावंत, आदेश अफंडकर, सुरेंद्र राऊत, रुपेश राऊत, महेंद्र शिंदे, गजा राऊत, रव्या गुरव, अभी गुरव, मयूर गुरव (अँप्पी), आशिष राऊत, नितेश राऊत, योगेश राऊत, देवेंद्र नारकर, संदीप राऊत, शशिकांत राऊत.

या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी भाजपा कणकवली तालुका प्रमुख दिलीप तळेकर, खारेपाटण माजी जि.प. सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार, भाजपचे खारेपाटण येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच रमाकांत राऊत, भाजप कणकवली तालुका सचिव सुधीर कुबल, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, भाजप कार्यकर्ते चिन्मय तळेकर, भाऊ राणे, राजेंद्र वरूणकर, शेखर शिंदे, तृप्ती माळवदे, उज्ज्वला चिके, साधना धुमाळे, अंजली कुबल, मनाली होणाळे, किशोर माळवदे, राजा जाधव, योगेश पाटणकर, गणेश कारेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजप पक्षात प्रवेश केलेले युवा कार्यकर्ते यांनी तेजस राऊत यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून भाजप पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले व भाजप पक्षाला खारेपाटणमध्ये अधिक जोमाने वाढवणार असल्याचे देखील सांगितले. तर मंत्री नितेश राणे यांनी खारेपाटण गावच्या विकासाला चालना देण्यासाठी सतीश गुरव आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते यांनी जसा दहिहंडीसाठी उंच थर लावण्यासाठी खांदा दिला जातो तसा आपण उंचच उंच विकासाची दहीहंडी बांधण्यासाठी एकत्र मिळून कार्य करूया, असे सांगितले. तर माझ्या पालकमंत्री काळात खारेपाटण गावातील प्रलंबित विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन खारेपाटण मधील ग्रामस्थांना नामदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिले.











