सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील गांगोवाडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर उर्फ हरी मास्तर विठ्ठल सावंत (९६) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. हरी मास्तर यांनी कणकवली तालुक्यातील अनेक गावातील शाळांमध्ये विद्यार्जन केले. मुळ गाव नरडवे येथील विविध उपक्रमांमध्ये त्याचा नेहमी सहभाग असे. जुन्या पिढीतील चांगले शिक्षक म्हणून त्यांचे आदराने नाव घेतले जाते. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, ३ विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील टेम्पो व्यावसायिक अशोक व मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते राजू सावंत यांचे ते वडील होत. त्याच्यावर सोमवारी सायंकाळी नरडवे टेमकरवाडी येथील स्मशानभूमीत अंतसंस्कार करण्यात आले

error: Content is protected !!