नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते महेश (राजू) लक्ष्मण तांबे यांची नुकतीच नांदगाव गावच्या म.गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
नांदगाव गावच्या सरपंच रविराज मोराजकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 22 ऑगस्ट, 2025 ग्रामपंचायतची सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सभेत नांदगाव गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी आर. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी म.गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महेश तांबे यांची सर्वानुमते गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. यावेळी सरपंच रविराज मोराजकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी यावेळी उपसरपंच इरफान साठविलकर, ग्रामपंचायत अधिकारी आर. डी. सावंत, माजी सरपंच हर्षदा वाळके, कासार्डे बिटचे चंद्रकांत झोरे, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.










