मॅरेथॉन स्पर्धेत मोनिका कोळेकर, दिपक फाले अव्वल; मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
कणकवली (प्रतिनिधी) : हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या गौरवार्थ राष्ट्रीय खेळ दिन २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. जिल्हा प्रशासनानेही या निमित्ताने जिल्हाभरातून क्रिडा सप्ताहाचे आयोजन केले आहे. क्रीडा सप्ताहात आयोजित स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग घ्यावा. स्पोर्ट क्लब फाऊंडेशन व पत्रकार संघाने ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत धावपटूंना चांगले व्यासपीठ निर्माण करुन दिले, स्पर्धकांचा उत्साह पाहता अशा स्पर्धा नेहमी झाल्या पाहिजेत, आपले जीवन सुदृढ बनण्यासाठी नेहमी धावण्याची गरज असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.
स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, कणकवली तालुका पत्रकार संघ व शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग आयोजित कणकवली ५ किमी नॅशनल स्पोर्ट्स डे मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या स्पर्धेत कौशिक अदबर, मैथिली गावडे, लवू ठाकूर, महिमा मोहिते, आशीर्वाद सातपुते, सेहा तेरसे, नवू फाले, मेघा सातपुते, दिपक फाले व मोनिका कोळेकर यांनी आपआपल्या गटातून अव्वल स्थान पटकावले आहे.
तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके म्हणाले, स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी खेळाची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या मोबाईलच्या जमान्यात मुलांनी मैदानात उतरावे आणि आपले आरोग्य राखावे ही अपेक्षा अशा उपक्रमांच्या माध्यमातून साध्य होऊ शकते. अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मुले मैदानी खेळांकडे वळतील. तालुका पत्रकार संघ अशा उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देत असतो.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :-
१२ वर्षाखालील मुले – १ किमी धावणे –
प्रथम क्रमाक – कौशिक अदबर
द्वितीय क्रमांक – राहुल स. गोसावी
तृतीय क्रमांक – मयंक की. आचरेकर (अश्वमेध स्पोर्ट्स)
१२ वर्षाखालील मुली – १ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – मैथिली गावडे
द्वितीय क्रमांक – सृष्ठी कुडतरकर (सेंट उर्सुला स्कूल, कणकवली)
तृतीय क्रमांक – आध्या राकेश चौगुले (सिंधुरत्न अकॅडमी, कणकवली)
१४ वर्षाखालील मुले – २ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – लवू ठाकूर
द्वितीय – वेदांत फोपले
तृतीय – पृथ्वीराज स. राठोड (अश्वमेध स्पोर्ट्स)
१४ वर्षाखालील मुली – २ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – महिमा मोहिते
द्वितीय क्रमांक – आस्था अमित लिंगवत
तृतीय क्रमांक -दुर्वा उदय पवार
१७ वर्षाखालील मुले – ३ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – आशीर्वाद प्रमोद सातपुते (अश्वमेच स्पोर्ट्स अकॅडमी)
द्वितीय क्रमांक – सर्वेश घाडीगावकर (त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवडे)
तृतीय क्रमांक – राकेश रामचंद्र शेट (अश्वमेध स्पोर्ट्स)
१७ वर्षाखालील मुली – ३किमी धावणे –
प्रथम क्रमांक – सेहा तेरसे (तेज स्पोर्ट्स क्लब)
द्वितीय क्रमांक – संध्या गोधोळकर (सिंधुरत्न अकॅडेमी, कणकवली)
तृतीय क्रमांक – श्रद्धा सुनील रुपे (अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी)
१९ वर्षाखालील मुले – ५ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – नऊ संतोष फाले (सिग्मा अकॅडमी)
द्वितीय क्रमांक – पियुष सावंत
तृतीय क्रमांक – मंथन कांबळी
१९ वर्षाखालील मुली – ५ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – मेघा प्रमोद सातपुते (अश्वमेध स्पोर्ट्स. अकॅडमी)
द्वितीय क्रमांक – सानिका घाडीगावकर
तृतीय क्रमांक – ममता अंगचेकर
पुरुष खुला गट – ५ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – दीपक फाले (गुरुकुल अकॅडमी)
द्वितीय क्रमांक – संकेत चव्हाण (गुरुकुल अकॅडमी)
तृतीय क्रमांक – बाळा सावंत
महिला खुला गट – ५ किमी धावणे –
प्रथम क्रमांक – मोनिका कोळेकर (गुरुकुल अकॅडमी)
द्वितीय क्रमांक – रेश्मा पांढरे
तृतीय क्रमांक – रुही लाड (गुरुकुल अकॅडमी)
शालेय गट चॅम्पियान ट्रॉफी – सेंट उर्सुला स्कूल वरवडे, ओव्हरऑल चॅम्पियन ट्रॉफी – अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमी,
प्रत्येक गटातील विजेत्या खेळाडूंचा प्रत्येकी आकर्षक चषक, सन्मानपत्र, मेडल आणि बॉडी टेंपल फिटनेस सेंटरच्यावतीने शुज देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी व्हेन्यू पार्टनर कणकवली कॉलेज कणकवली, प्रमुख प्रायोजक बॉडी टेम्पल फिटनेस जिम श्री. गुरव, अबिद नाईक (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), स्पोर्ट्स सॅक पारस स्पोर्ट्स अनिल परब तथास्तु फिजिओथेरपीचे राहुल जगताप यांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेला तांत्रिक अधिकारी म्हणून स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण कदम व समिर राऊत यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण, राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांच्यासह स्वप्नील कदम, भूषण घाडीगावकर, नम्रता लाड, निकीता लाड, तेजस घाडीगावकर, ॲड. अभिजित सावंत, प्रज्ञेश निगरे, भालचंद्र कुलकर्णी, एकनाथ धनवटे, दिवाकर पवार, मंदार परब आदींनी विशेष परिश्रम घेतले.










