गावातील हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन हरिनामाचा आंनद लुटा – संतोष कानडे बुवा यांचे आवाहन….!

भजन संस्कृती जोपासणाऱ्या चिंदर गावातील भजन मंडळाना भजन साहित्य भेट

चिंदर ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा भजन संस्था अध्यक्ष संतोष कानडे यांची प्रमुख उपस्थिती

आचरा (प्रतिनिधी) : धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या चिंदर गावातील सांस्कृतिक वारसा जपणा-या 26 भजन मंडळाना चिंदर ग्रामपंचायतच्या कला व क्रीडा योजने अंतर्गत ग्रामपंचायत स्वनिधीतून भजन साहित्याचे वितरण भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा भजन संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना जिल्हा भजन संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष कानडे म्हणाले की, चिंदर ग्रामपंचायत राबवित असलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून 26 भजन मंडळे गावात असल्याचे पाहिल्यावर मला भजनी बुवा म्हणून अभिमान वाटला. या उपक्रमाची जिल्ह्यातील ग्रामपंचायत दखल घेतील, गावातील हरिनाम सप्ताहात सहभागी होऊन हरिनामाचा आंनद लुटा असे हि आवाहन यावेळी संतोष कानडे बुवा यांनी केले. ते पुढे म्हणाले कि, महायुतीच्या सरकार मुळे भजन मंडळाना चांगले दिवस आले आहेत. तसेच यावेळी गावातील भजन मंडळाना सरकारी योजना, अनुदान यावर सविस्तर माहिती दिली. मला मार्गदर्शनासाठी कधीही हाक द्या असे आश्वासन बुवा संतोष कानडे यांनी दिले.

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून अशा प्रकारचे भजन साहित्य भेट देण्याची सुरूवात देवगड मधून झाली होती. अशा उपक्रमांतून आध्यात्मिक प्रेरणेना मिळते, चिंदर ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक करत, आपण भजनाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपा असे वक्तव्य अध्यक्षीय भाषणात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे या कोकणच्या सुपुत्रांना योग्य न्याय मिळाला असून आपल्यासाठी हा सुवर्णकाळ आहे. आणि या मुळे आपली साथ असेल तर आपल्यालाही अशा प्रकारचा न्याय देण्याचे काम महायुतीच्या सरकार कडून होईल असे ते पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी तर प्रास्ताविक धोंडी चिंदरकर यांनी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी भजन मंडळांना २५००० रु अनुदान दिल्याबद्दल आभार मानले, तसेच गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्याबद्दल महायुती सरकार चे आभार व्यक्त केले. गावातील प्रत्येक समाजाचा आपण विचार करत असून सर्वाना समान न्याय देण्याची प्रयत्न आपण करणार असल्याचे चिंदरकर म्हणाले‌. भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी यावेळी भजन मंडळीं, भजन प्रेमींना बहुमोल मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच स्वरा पालकर-महंकाळ, जिल्हा ओ. बी. सी सचिव प्रकाश मेस्त्री, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, तालुका उपाध्यक्ष हिमाली अमरे, तालुका चिटणीस दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, जान्हवी घाडी, सानिका चिंदरकर, शशिकांत नाटेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, पोलिस पाटील दिनेश पाताडे, परेश चव्हाण, शिशीर पालकर, अजित साटम, रवि घागरे, चंद्रशेखर पालकर, महेंद्र चिंदरकर, शंकर पालकर, वेदांत चिंदरकर, गोपाळ लब्दे, संतोष अपराज, मोहन चिंदरकर, बाबा कावले, सुनिल पवार, विराज सावंत, रावजी तावडे, आनंद पवार, योगेश चव्हाण, ओमकार गोलतकर, आशिष कोरगांवकर, सुबोध गांवकर, शंकर गांवकर, शेखर पाताडे, प्रतिक्षा पालकर, सोहम चिंदरकर, विजय माळगावकर, विभावरी चव्हाण, हरि चव्हाण, महेश गोलतकर, संजय लोके, सिध्देश नाटेकर, विश्राम माळगांवकर, समिर अपराज, संदिप सावंत, रोहित पाटील, गौरव दत्तदास, भजनी बुवा, भजन प्रेमी, उपस्थित होते.

या भजनी मंडळांमध्ये गावडेपुरुष प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावडेवाडी, श्री देव रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ चिंदर देऊळवाडी, ब्राम्हणदेव प्रासादिक भजन चिंदर लब्देवाडी, तेरई ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर तेरई, वाडात्री ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ अपराजवाडी, रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कुंभारवाडी, भगवती प्रासादिक भजन मंडळ चिंदर भटवाडी, आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ गावठणवाडी, पावणाई प्रासादिक भजन मंडळ खरीवाडी, ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ साटमवाडी, भवानी प्रासादिक भजन मंडळ चिंदर तेरई, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ चिंदर गोलतकरवाडी, ब्राम्हणदेव सेवा मंडळ चिंदर हडकरवाडी, गणेश भजन मंडळ चिंदर पाटणवाडी, स्वामी समर्थ भजन मंडळ कुंभारवाडी ( मदल), पिसाळी प्रासादिक भजन मंडळ तेरई, पिसाळी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ तेरई, सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळ भगवंतगड, सिध्देश्वर प्रासादिक भजन मंडळ चिंदर सडेवाडी, पटकी देवी प्रासादिक भजन मंडळ माधववाडी, गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ पालकरवाडी, बालगोपाळ प्रासादिक भजन मंडळ कोंडवाडी, लब्देवाडी सेवा मंडळ लब्देवाडी, ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ देवकोंडवाडी, दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ गावठणवाडी, भवानी प्रासादिक भजन मंडळ पवारवाडी आदी मंडळाचा समावेश आहे.

error: Content is protected !!