ग्रामपंचायत अधिकारी शिवराज राठोड यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विशेष सन्मान

PAI 1.0 राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल मा. ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते ग्रामपंचायत अधिकारी शिवराज राठोड यांचा विशेष सन्मान

ब्युरो न्यूज : शिवराज राठोड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंजवडे गावात ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक विविध अभियानांमध्ये किंजवडे ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश मिळवले आहे. शिवराज राठोड यांच्या अचूकता, गुणवत्ता आणि वेग या त्रिसूत्रीवर भर देऊन काम करण्याचे हे फलित आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

पंचायत विकास निर्देशांक 1.0 मध्ये ग्रामपंचायत किंजवडे ला राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळविल्याबद्दल ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासनाचे मंत्री ना. जयकुमार गोरे, प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन एकनाथ डवले (भा. प्र. से.), तसेच उपमहासंचालक तथा संचालक, राज्य ग्रामविकास संस्था (यशदा, पुणे) डॉ. मल्लिनाथ कळशेट्टी यांच्या हस्ते पुणे येथे शिवराज राठोड (ग्रामपंचायत अधिकारी, सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!