खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांचा वाढदिवस खारेपाटण येथे आज धार्मिक कार्यक्रम घेऊन उस्ताहात साजरा करण्यात आला. यावेळी खारेपाटणचे ग्रामदेवता श्री केदारेश्वर धनी रवळनाथ या मंदिरात सकाळी आठ वाजता सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांच्यासह तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या उपस्थितीत ब्राह्मणाकरवी श्री चरणी अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली. शिवसेना शिंदे सेनेचे उपनेते संजय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी मनोभावे सर्वांच्या वतीने सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, विभाग प्रमुख गुरुप्रसाद शिंदे शहर प्रमुख सुहास राऊत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगेश ब्रम्हदंडे, महिला शहरप्रमुख अस्ताली पवार, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













