उंडील गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी कृष्णा नर यांची बिनविरोध निवड

देवगड (प्रतिनिधी) : उंडील गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री. कृष्णा मोतीराम नर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकतीच उंडील ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच श्रीमती उज्वला यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेत कृष्णा नर यांची निवड करण्यात आली. या सभेस सरपंच उज्वला यादव, उपसरपंच जयेश नर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील मतदार ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नवीन तंटामुक्ती समिती अध्यक्ष म्हणून कृष्णा मोतीराम नर यांची निवड करण्यात आली. संपूर्ण गावातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!