फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या 30 व्या वर्धापन दिनाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय आपला 30 वा वर्धापन दिन शुक्रवार, दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन महेश सावंत, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार विठोबा तायशेटे, सर्व संचालक तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जीवन आनंद संस्था संचलित स्नेहसिंधू निराधार आश्रम, फोंडाघाट येथील निराधारांना जुन्या परंतु सुस्थितीतील कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या सहकार्याने आजी-माजी विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच फोंडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यासाठी मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून हे शिबिर सकाळी 8.30 वाजता सुरू होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.पुरंधर नारे यांनी केले आहे.

error: Content is protected !!