600 हुन अधिक गणेशदर्शन घेत जनतेशी संवाद
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका व रत्नागिरी शहर या भागात सुमारे ६०० हुन अधिक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेत श्री गणराया कडे साकडे घातले आहे. या कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील तरुण-तरुणींना रोजगार नोकरी उपलब्ध व्हावी या दृष्टीने या भागात उद्योग व्यवसाय निर्माण व्हावेत. कृषी फलोत्पादन, मच्छी आणि पर्यटनाच्या माध्यमातून या भागात नवे उद्योग व्यवसाय निर्माण व्हावेत यासाठी आम्हाला शक्ती दे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या भागाचा रोजगार, नोकरी, शिक्षण, आरोग्य दृष्ट्या विकास व्हावा. सर्वदृष्ट्या समृद्धी निर्माण व्हावी यासाठी आम्हा सर्वांच्या हातून चांगले कार्य घडो असे घातले. नोकरी, रोजगाराचे दालन या भागात उपलब्ध होऊन प्रत्येक घरातील तरुणाईला आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने यापुढे कार्य केले जाईल असे ते म्हणाले.
युवा उद्योजक तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांचे सामाजिक व दातृत्व हे काम केल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. तरुणांचे ताईत असलेले विशाल परब यांची गेल्याच महिन्यात भाजपमध्ये घरवापसी झाली आणि त्यांनी गावागावात भाजप पक्ष वाढीच्या दृष्टीने आपले कार्य सुरु केले आहे.
विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांनी त्यांनी प्रत्येक गावागावात गाठीभेटी घेत गावातील वाड्यावाड्यात सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्या सरकारच्या माध्यमातून कशा सोडवता येतील या दृष्टीने त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे.
विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या कालावधीत त्यांनी अनंत चतुर्थी पर्यंत म्हणजे तब्बल अकरा दिवस त्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या भागातील सुमारे साडेपाचशे हुन अधिक घरगुती गणपतींना भेटी देत आशीर्वाद घेतले. सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्याही घरी गणपतीला भेट देत त्यांच्यासोबत भजन आरती यालाही त्यांनी साथ दिली. एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधीलच एक कार्यकर्ता त्यांचे वावरणे सर्वांना आनंद देणारे ठरले आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, चौकुळ ते सातार्डा, सातोसे, मळेवाड, बांदा तर दोडामार्गातील मांगेली अशा दुर्गम भागापर्यंत त्यांनी गावागावात गाठीभेटी घेत भजन आरतीच्या मेळातही ते सहभागी झाले. भाजपचा कार्यकर्ता कसा असावा तो सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा, त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा, त्यांच्या आनंदात सहभागी होणारा अशा पद्धतीने विशाल परब यांनी या गणेश चतुर्थीच्या कालावधीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने घरोघरी गणपती दर्शन घेत एक नवा पायंडा घालून दिला आहे. तसेच रत्नागिरी शहरात सार्वजनिक गणेश दर्शन तसेच काही घरगुती कार्यकर्त्यांच्या घरीही त्यांनी गणेश दर्शन घेतले. येथील सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांच्या समस्या अडचणी काय आहेत हे जाणून घेत त्यांना मार्गदर्शनही केले.











