पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल फिरता दवाखाना

सावंतवाडी मतदारसंघातील गरजूंची होणार मोफत आरोग्य तपासणी

सावंतवाडी मतदारसंघासाठी आरोग्यदूत विशाल परब यांचा विशेष सेवाभावी उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गरजू जनतेसाठी भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून डिजिटल फिरता दवाखाना – आरोग्य आपल्या दारी या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ होत आहे. पंतप्रधान मोदी यांचा 75 वा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी देशभरात सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. सावंतवाडी व परिसरासाठी तर डिजीटल फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून “आरोग्य आपल्या दारी” येत आहे.

भारतवर्षाचा उर्जा स्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून डिजीटल मोफत दवाखाना आपणासाठी आरोग्य आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत रक्त तपासणी, हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रोल, रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, हृदय विकारातील सर्व तपासण्या, ई.सी.जी., युरिन टेस्ट, वजन, उंची, बॉडी मास, हाडांचा ठिसूळपणा या सारख्या १०० हून अधिक आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. आरोग्य तपासणी नंतर अवघ्या ५ ते १० मिनिटात तपासणीचा रिपोर्ट आपणास मिळणार आहेत.

error: Content is protected !!